- Home

- Marathi India

- रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस
रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस (RTO)
रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस (RTO) हे भारतीय मोटार वाहन अधिनियम, 1988 नुसार कार्यरत असते. व्हेहीकल रजिस्ट्रेशन, ड्रायव्हिंग लायसन्स देणे, री-रजिस्ट्रेशन व RCचे रिन्यूअल करण्यापासून ते टॅक्स आणि फी भरण्यापर्यंत वाहनांशी संबंधित प्रत्येक कार्य RTO द्वारे पार पाडले जाते.
Read more
RTO ची प्रमुख कार्ये
रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस हे 'भारतीय मोटार वाहन अधिनियम, 1988' नुसार कार्यरत असते. वाहनांचे रजिस्ट्रेशन, ड्रायव्हिंग लायसन्स देणे, री-रजिस्ट्रेशन व RC रिन्यूअल करण्यापासून ते कर आणि शुल्क भरण्यापर्यंत वाहनांशी संबंधित प्रत्येक कार्य RTO द्वारे पार पाडले जाते.
भारतातील सर्व RTOsद्वारे पार पाडली जाणारी कार्ये खाली नमूद केली आहेत:
- करांची वसुली: रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस हे भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या विविध प्रकारच्या वाहनांवर आकारले जाणारे सर्व रोड टॅक्सेस वसूल करते. रोड टॅक्सच्या वसुलीव्यतिरिक्त, RTO बहुउद्देशीय वाहनांकडून IMV शुल्क देखील वसूल करते.
- रस्ते सुरक्षा सुनिश्चित करणे: RTO रस्ते सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करते आणि मोटार वाहन कायदा, 1988 द्वारे निर्धारित केलेल्या सर्व वाहतूक नियमांचे सर्व वाहने योग्यरित्या पालन करत आहेत की नाही हे तपासते. तसेच, अनिवार्य थर्ड-पार्टी विमा असलेल्या सर्व वाहनांची नोंदही ठेवते.
- वाहनांचे रजिस्ट्रेशन: मोटार वाहन नियमांनुसार, भारतातील प्रत्येक वाहनासाठी आपल्या संबंधित राज्याच्या RTO कडून परमनंट रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त करणे अनिवार्य आहे. त्यामुळेच, RTO सर्व प्रकारच्या वाहनांना टेंपररी आणि परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वितरित करण्याचे कार्यही पार पाडते. शिवाय, जेव्हा एखाद्या कारचे RC मुदत संपण्याच्या टप्प्यावर असते, तेव्हा त्याचे रिन्यूअल करण्याचे कामही RTO द्वारे केले जाते.
- ड्रायव्हिंग लायसन्स जारी करणे: भारतात वाहन चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स सोबत बाळगणे ही देखील एक अनिवार्य अट आहे. जर तुम्ही लायसन्सशिवाय आढळलात, तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचे काम देखील रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसद्वारे केले जाते.
- गाड्यांचे इन्सपेक्शन: RTO, RC रिन्यूअल आणि फिटनेस सर्टिफिकेट जारी करण्याच्या वेळी, वाहनांच्या एमीशन लेव्हल्स व रस्त्यावर चालण्यास ती योग्य आहेत की नाही, इ. बाबींची तपासणी करण्याचे कार्यही पार पाडते. सर्व वाहने MV अॅक्टने घालून दिलेल्या नियमांचे आणि मानकांचे पालन करतात, याची खात्री RTO करते.
- पोल्युशन टेस्ट करणे: भारतातील रस्त्यांवर धावणारी सर्व वाहने सुस्थितीत आहेत आणि त्यांनी निर्धारित पर्यावरणीय निकषांचे पालन केले आहे, याची खात्री करण्यासाठी RTO पोल्युशन टेस्ट घेते आणि वाहनांना पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट प्रदान करते.
टेंपररी व्हेहीकल रजिस्ट्रेशन विषयी
केंद्रीय मोटार वाहन कायद्याच्या कलम 43 मध्ये नमूद केलेल्या तरतुदींनुसार, केवळ वाहनाला दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्याची आवश्यकता असल्यासच टेंपररी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळवणे अनुज्ञेय असते. जेव्हा वाहन अगदी नवीन असते आणि त्याचे परमनंट रजिस्ट्रेशन होणे अद्याप बाकी असते, तेव्हा ज्या डिलरकडून ते वाहन खरेदी केले जाते, त्याच डिलरद्वारे हा नंबर देखील प्रदान केला जातो.
साधारणपणे, टेंपररी RC एका महिन्याच्या कालावधीसाठी वैध असते. या कालावधीत, आपल्या शहराच्या किंवा राज्याच्या RTO कडे आपल्या वाहनाचे परमनंट रजिस्ट्रेशन करून घेणे अत्यावश्यक असते.
परमनंट व्हेहीकल रजिस्ट्रेशन विषयी
परमनंट रजिस्ट्रेशन नंबर हा संबंधित राज्याच्या RTO द्वारे जारी केला जाणारा एक कायमस्वरूपी ओळख क्रमांक आहे. भारतात एखादे वाहन केवळ तेव्हाच चालवता येते, जेव्हा त्याकडे परमनंट रजिस्ट्रेशन नंबर असतो.
- वाहन मालकाने वाहन ताब्यात घेतल्यापासून 7 दिवसांच्या आत परमनंट RC साठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- याशिवाय, परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट 15 वर्षांच्या कालावधीसाठी वैध असते; त्यानंतर संबंधित RTO कडून त्याचे रिन्यूअल करणे आवश्यक असते.
भारतातील RTO अर्जांचे प्रकार
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाइटवर अनेक RTO फॉर्म्स उपलब्ध आहेत, जे तुम्ही RTOशी संबंधित कोणत्याही कामासाठी सहजपणे डाउनलोड करून वापरू शकता. त्यापैकी काही फॉर्म्सची थोडक्यात माहिती येथे दिली आहे-
| फॉर्म नंबर | तपशील |
| फॉर्म 3 | लर्नर्स लायसन्स |
| फॉर्म 20 | मोटार वाहनाच्या रजिस्ट्रेशनसाठी अर्ज |
| फॉर्म 20B | टेंपररी रजिस्ट्रेशन पिरीअड वाढवण्यासाठी अर्ज |
| फॉर्म 21 | सेल्स सर्टिफिकेट |
| फॉर्म 22 | रोड-वर्दीनेस सर्टिफिकेट |
| फॉर्म 23 B | टेंपररी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट |
| फॉर्म 25 | रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटच्या रिन्यूअलसाठी फॉर्म |
| फॉर्म 26 | डुप्लिकेट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज |
| फॉर्म 29 | मोटार वाहनाच्या ओनरशिप ट्रान्सफरबाबत नोटिस |
| फॉर्म 31 | वाहनाच्या ओनरशिप ट्रान्सफरसाठी अर्ज |
| फॉर्म 32 | पब्लिक ऑक्शनच्या बाबतीत ओनरशिप ट्रान्सफरसाठी अर्ज |
| फॉर्म 24 | मोटार वाहनाचे रजिस्ट्रेशन |
| फॉर्म 38 A | इन्सपेक्शन रिपोर्ट |
| फॉर्म 51 | इन्शुरन्स सर्टिफिकेट |
| फॉर्म 50 | बिल ऑफ लेडीनग |
| फॉर्म 57 | फॉरेन इन्शुरन्ससाठी सर्टिफिकेट |
| फॉर्म 54 | अॅक्सीडेन्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट |
भारतातील RTO फी आणि चार्जेस
खाली भारतामधील RTO फी आणि चार्जेस दर्शवणारा तक्ता दिला आहे:
| उद्देश | घेतली जाणारी फी |
| RC ची तयार किंवा रिन्यू | रु. 50- रु. 3,000 |
| हायपोथीकेशन चार्ज | रु. 1500 |
| नंबर प्लेट | रु. 250- रु. 400 |
| टेंपररी रजिस्ट्रेशन | रु. 1500 ते रु. 2500 |
| ओनरशिप ट्रान्सफर | रु. 300- रु. 3,000 |
| डुप्लीकेट RC | रु. 25 - रु. 1500 |
वाहनाच्या रजिस्ट्रेशनचे तपशील ऑनलाईन कसे तपासावेत?
- भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) भारतात वाहन रजिस्ट्रेशनसाठी ‘वाहन’ पोर्टल सुरू केले आहे.
- वाहन रजिस्ट्रेशन, वाहनाची ओनरशिप ट्रान्सफर, परमीट रिन्यूअल, फिटनेस सर्टिफिकेट जारी करणे इत्यादींसाठी तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता.
- या पायऱ्यांचे पालन करून, तुम्ही परिवहन पोर्टलद्वारे RTO च्या संकेतस्थळावर तुमच्या वाहनाची माहिती किंवा रजिस्ट्रेशन तपशील सहजपणे तपासू शकता:
- परिवहन पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- ‘इन्फॉर्मेशनल सर्व्हिसेस’ या ड्रॉपडाऊनमधून, ‘नो युअर व्हेहीकल डिटेल्स’ हा पर्याय निवडा
- तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा किंवा अकाऊंट तयार करा
- OTP आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा
- तुमच्या वाहनाचे रजिस्ट्रेशनविषयक सर्व तपशील मिळवण्यासाठी ‘गेट डिटेल्स’ हा पर्याय निवडा.
RTO विषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न
RTO हे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसचे संक्षिप्त रूप आहे. ही एक शासकीय संस्था आहे, जी भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या सर्व वाहनांचे व्यवस्थापन आणि त्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम करते.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करणे ही RTO ची मुख्य भूमिका आहे. प्रत्येक वाहनाचे रजिस्ट्रेशन नजीकच्या RTO कार्यालयात करणे अनिवार्य असते. याव्यतिरिक्त, मोटार इन्शुरन्सची तपासणी करणे, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल व जारी करणे, पोल्युशन सर्टिफिकेट देणे आणि तत्सम बाबींची जबाबदारीही RTO वर असते.
मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 39 नुसार, संबंधित राज्याच्या RTO कडे रजिस्ट्रेशन केल्यावरच एखादे वाहन चालवण्याची परवानगी दिली जाते.
होय, भारत सरकारच्या अधिकृत परिवहन पोर्टलद्वारे हे तपशील ऑनलाइन तपासणे शक्य आहे.
होय, सहज ओळख पटण्यासाठी प्रत्येक राज्याचा एक विशिष्ट RTO कोड असतो; उदाहरणार्थ: गुजरात-GJ, हरियाणा-HR इत्यादी. याच RTO कोड्सनुसार वाहनांना रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो.
होय, भारतातील प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाची सहज ओळख पटण्यासाठी एक विशिष्ट RTO कोड असतो; उदाहरणार्थ, दमन आणि दीवसाठी 'DD', पुदुच्चेरीसाठी 'PY' आणि याचप्रमाणे इतरही.
होय, वाहनाचा मालकी हक्क ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही खाली नमूद केलेल्या पायऱ्यांचे पालन करू शकता:
- ऑनलाईन परिवहन सेवा पोर्टल वर जा.
- त्यानंतर 'ऑनलाइन सर्व्हिसेस' या ड्रॉपडाऊन मेनूवर जाऊन, 'ट्रान्सफर ऑफ ओनरशिप' हा पर्याय निवडा.
- नवीन मालकाचा तपशील सादर करा.
- आता खालील पर्यायांमधून ट्रान्सफरचे कारण निवडा – चोरी / विक्री / वारसा हक्क / लिलाव.
- मालकाचे नाव, अनुक्रमांक, मालकाचा प्रवर्ग, वडील/पतीचे नाव, विक्रीची तारीख (फॉर्म 29 नुसार) आणि विक्रीची रक्कम ही माहिती भरा.
- वाहन फायनान्सरच्या नावावर असेल, तर FRC हा पर्याय निवडा.
- तुमच्या पत्त्याचा तपशील (सध्याचा/परमनंट) सादर करा.
Explore More Under Motor Insurance
- Motor Insurance
- Car Insurance
- Bike Insurance
- Third Party Insurance
- Third Party Bike Insurance
- Car Insurance Calculator
- Car Insurance Companies
- Bike Insurance Companies
- Bike Insurance Calculator
- Commercial Vehicle Insurance
- Tractor Insurance
- Truck Insurance
- Check Car Insurance Status
- New Cars Price
#Rs 2094/- per annum is the price for third-party motor insurance for private cars (non-commercial) of not more than 1000cc
*Savings are based on the comparison between the highest and the lowest premium for own damage cover (excluding add-on covers) provided by different insurance companies for the same vehicle with the same IDV and same NCB. Actual time for transaction may vary subject to additional data requirements and operational processes.
+Savings are based on the maximum discount on own damage premium as offered by our insurer partners.
^Lowest Price Guaranteed is based on certifications shared by insurers with us. Policybazaar will facilitate price matching subject to the terms and conditions of select insurers.
##Claim Assurance Program: Pick-up and drop facility available in 1400+ select network garages. On-ground workshop team available in select workshops. Repair warranty on parts at the sole discretion of insurance companies. Dedicated Claims Manager. 24x7 Claim Assistance.